image

Project 2 , three days for nation

योगिताचा वाढदिवस...

*बाहेर प्रचंड पाऊस होता आणि राजच्या घरात आनंदाचा अपार पूर आलेला होता*


 

आज सकाळ पासूनच रिमझिम चालू होती. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. बराच आळस अंगात भिनला होता. दुपारचे जेवण झाले आणि चांगलीच ताणून दिली.


 

तीनच्या आसपास फोन वाजला. अर्धवट झोपेतच फोन घेतला.


 

"दादा आज जायचे न वस्तीवर ? आम्ही कसे येऊ ?" योगिताचा फोन होता.


 

"अग पाऊस आहे. कसे जाता येईल ?"


 

"जाऊ न दादा. पाऊस थांबेल तो पर्यंत." योगिता खूपच तळमळीने बोलत होती.


 

ती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालयात अंतिम वर्षाला शिकते. तिचा आज वाढदिवस होता. तिला वस्तीवरील मुलांच्या सोबत तो साजरा करायचा होता. मुलांसाठी केळी, बिस्कीट, वही पेन असे बरेच साहित्य तिने घेऊन ठेवले पण होते.


 

दुपारी पाचला आमचं जायचं ठरलं होतं. साडेचार वाजता जोरात पाऊस आला. योगिता कॉलेज मध्येच होती. ती पावसातच घरी आली. तिचा वस्तीत जाण्याचा निर्धार अपार होता. तिच्या निर्धारा पुढे माझा आळस फिका